Chhagan Bhujbal: ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राजकीय संबंधांवर खुलासा करत स्पष्टपणे सांगितले की, आमचे एकमेकांशी सलोख्याचे संबंध आहेत. ते म्हणाले, “विधानसभेत आमची रोज भेट होते. भेटी नाही घ्यायच्या तर काय मारामारी करायची?”
ते पुढे म्हणाले, “राजकारणात आम्ही विरोधी पक्षात असलो तरी कोणी कोणाचा शत्रू नाही. प्रत्येक जण प्रत्येकाला भेटतो, विचारपूस करतो. त्यामुळे कोणतेही गैरसमज नकोत.” (Marathi News Today)