SSC Result 2024: दहावीचा निकाल ९५.८१ टक्के, येथे पहा सविस्तर अपडेट

पुणे, २७ मे २०२४: महाराष्ट्र बोर्डाने सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन दहावी निकाल जाहीर केला गेला. दहावी २०२४ परीक्षेसाठी एकूण १५ लाख ६० हजार १५४ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५  लाख ४९ हजार ३२६ विद्यार्थ्यांनी परीक्षेत प्रविष्ट झाले. त्यापैकी १४ लाख ८४ हजार ४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण राज्याचा दहावीचा निकाल ९५.८१ टक्के लागला.

दहावी निकाल २०२४

दरवर्षी प्रमाणे कोकण विभागाने ९९.०१  टक्के सर्वाधिक निकाल असून कोकण विभागाने यंदा ही बाजी मारली आहे. तर नागपूर विभागाचा निकाल  ९४.७३ टक्के इतका असून सर्वात कमी निकाल आहे.

दहावी निकालात यंदा ही मुलींची बाजी

दहावी निकाल २०२४ ह्या वर्षी मुलींचा निकाल ९७.२१ टक्के असून मुलांची टक्केवारी ९४.५६ टक्के आहे. म्हणजे मुलांपेक्षा मुलींचा निकाल २.६५ टक्के जास्त आहे.

एकूण ७२ विषयांपैकी १८ विषयांचा निकाल १०० टक्के लागलेला आहे.

विभागानुसार दहावी निकाल २०२४

कोंकण ९९.०१ टक्के
पुणे ९६.४४ टक्के
नागपूर ९४.७३ टक्के
छत्रपती संभाजीनगर ९५.१९ टक्के
मुंबई ९५.८३ टक्के
कोल्हापूर ९७.४५ टक्के
अमरावती ९५.५८ टक्के
नाशिक ९५.२८ टक्के
लातूर ९५.२७ टक्के

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या निकालाची लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे, नागपूर यांनी एक अधिसूचना जारी करून विद्यार्थ्यांना कळविले आहे की, निकाल जाहीर झाल्यानंतर तो खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध करून दिला जाईल.

दहावीचा निकाल कसा पाहायचा मोबाईलवर

  • सर्वप्रथम महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
  • मुखपृष्ठावर जा आणि एमएसबीएसएचएसई महाराष्ट्र बोर्ड एसएससी 10 वी निकाल 2024 लिंकवर क्लिक करा.
  • परीक्षा क्रमांक आणि आईचे नाव प्रविष्ट करा
  • महाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल स्क्रीनवर दिसेल.

महाराष्ट्र बोर्डाचा निकाल: ऑफलाइन निकाल पहा

एमएसबीएसएचएसई दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जर साइट क्रॅश झाली तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांना खाली दिलेल्या सोप्या स्टेप्सद्वारे एसएमएसद्वारे निकाल पाहता येणार आहे.

  • मोबाइल मेसेज बॉक्स उघडा.
  • येथे MH10 टाइप करून <Space> देऊन रोल नंबर प्रविष्ट करा
  • ५७७६६ या क्रमांकावर पाठवा.
  • असे केल्यावर तुमच्या मोबाईलवर रिझल्ट येईल.

Dahavi Nikal 2024 Marksheet Download: मार्कशीट डाऊनलोड करा

महाराष्ट्र मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एक ते दोन आठवड्यांत विद्यार्थ्यांच्या मूळ गुणपत्रिका संबंधित शाळेत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना पालकांसोबत जाऊन गुणपत्रिका मिळू शकणार आहे.


”SSC result 2024, dahavi nikal, dahavi nikal 2024, maharashtra board dahavi nikal, dahavi nikal link, dahavi nikal website, दहावी निकाल २०२४, दहावी निकाल, दहावी निकाल लिंक, दहावी निकाल २०२४ वेबसाईट, दहावी निकाल दाखवा, एसएससी निकाल, एसएससी निकाल २०२४, दहावी निकाल २०२४ लिंक, दहावी निकाल किती वाजता आहे, १० वी निकाल २०२४, १०वी निकाल लिंक, १०वी निकाल २०२४, १०वी निकाल वेबसाईट, १०वी निकाल, दहावी निकाल कधी आहे”

Leave a Comment