Pune News: शरद पवार-अजित पवार यांची पुण्यात भेट; संजय राऊत यांची परखड प्रतिक्रिया

पुणे, २२ मार्च: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटीलही उपस्थित होते.

संजय राऊत यांची स्पष्ट भूमिका

या भेटीवर महाविकास आघाडीतील मित्रपक्ष शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “शिवसेना सोडून गेलेल्यांशी आमचा कोणताही संपर्क नाही. आम्ही अशा नेत्यांच्या जवळही जाणार नाही. त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात केला आहे.” (Pune Marathi News)

ते पुढे म्हणाले की, “वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटसारख्या संस्था राष्ट्रवादी नेत्यांच्या अधिपत्याखाली आहेत. आमच्याकडे असे काहीही नाही, त्यामुळे आम्ही अशा बैठकांचा विचारही करत नाही.”

राजकीय हालचालींवर लक्ष

शरद पवार आणि अजित पवार यांची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. (Pune Latest News)