Supriya Sule: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला वाचाळवीरांवर कारवाई करण्याची विनंती केली आहे. त्या म्हणाल्या, “महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. त्यामुळे समाजात द्वेष पसरवणाऱ्यांना आळा घालावा.”
सुळे यांनी स्पष्ट केले की इतिहास हा इतिहासकार आणि तज्ज्ञांनीच अभ्यासावा. “जे या विषयाचे डोमेन एक्सपर्ट आहेत, त्यांना आपले काम करू द्या. आपण तज्ज्ञ नाही, त्यामुळे ऐतिहासिक तथ्यांमध्ये ढवळाढवळ होऊ नये,” असेही त्यांनी सांगितले.
त्यांनी पुढे सांगितले की ऐतिहासिक विषयांवर निर्णय घेताना सर्व पक्षांतील तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. सरकारने या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करून समाजात गैरसमज निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी त्यांची मागणी आहे